आदिनाथ कोठारे यांनी एक अनोखी गोष्ट मांडत प्रेक्षकांच्या भेटीस एक चित्रपट आणला आहे. 'पाणी' हा विषय किती जिव्हाळ्याचा असू अशकतो हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट म्हणजे "पाणी", पाणी हा चित्रपट नेहा बडजात्या, महेश कोठारे आणि बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी निर्मिती केलेला आहे. तसेच आदिनाथ कोठारे यांनी दिग्दर्शीत केलेला आहे. याचे पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी केलेले आहे. तर संगीत गुलजार सिंग यांनी केलेले आहे. एक सामान्य तरुणाच्या असामान्य प्रवासाची ही प्रेरणादायी गोष्ट आणि पाणी संघर्षाला प्रेमाचा ओलावा देण्याऱ्या या तरुणाची कथा यात मांडली गेली आहे. यामध्ये ‘नगं थांबू रं, करून दावं रं’‘फुटे पाझरं, वाहे खळ खळं, ऊसळली जिद रगातूनं’यांसारखी संघर्षाची गाणी ऐकायला मिळतील.
चित्रपटातले कलाकार आणि पात्र:
या चित्रपटात आदिनाथ कोठारे यांनी दिग्दर्शनासोबतचं अभिनयाचा विडा देखील उचलेला पाहायला मिळत आहे. यात त्याचे पात्र हे हनुमंताचे आहे आणि ऋचा वैद्यची म्हणजेच सुर्वणाची भावनिक साथ त्याला लाभलेली पाहायला मिळत आहे. त्याचसोबत यात सुबोध भावे यांनी देखील छोटी व्यक्तिरेखा साकारली आहे.
चित्रपटाची कथा:
चित्रपटाची कथा ह निखळ पाण्यासारख्या प्रेमकथेवर आधारित आहे. पाण्याची टंचाई असलेल्या गावात वसत्यांमध्ये लोकांना स्वतःची तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी फिराव लागत. यात अशाच एका गावची गोष्ट मांडण्यात आलेली आहे. त्या गावाचे नाव नागदरवाडी हे आहे या गावात हनुमंतचं लग्न सुर्वणासोबत ठरतं मात्र पाणी टंचाईमुळे तिच्या कुटुंबाकडून हे लग्न मोडण्यात येत. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी हनुमंत गावातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढायचा निर्धार करतो.
चित्रपटाचा रिव्ह्यू:
या चित्रपटाला 3.5 एवढे रिव्ह्यू मिळालेले आहेत. तर या चित्रपटाने 2.62 करोड एवढी कमाई केली आहे. एक सामान्य तरुणाच्या असामान्य प्रवासाची ही प्रेरणादायी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गावकऱ्यांचं आणि इतर छोट्या-छोट्या पात्रांचं कास्टिंग अचूक झालं आहे. चित्रपट दोन प्रेमींच्या प्रेमकहाणीवर असला तरी पाण्यासाठी आणि इतर गोष्टींचा संघर्ष अधिक प्रमाणात दाखवण्यात आलेला आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात आणि क्लायमॅक्सपर्यंत कथा अधिक प्रभाव पाडते. आदिनाथचा दिग्दर्शीत पाणी हा चित्रपट पाण्यासारखाच प्रेमासाठी निखळ आणि संघर्षमय आहे. त्याचा अभिनय नक्कीच कौतुकास्पद आहे मात्र ऋचाला अभिनयासाठी तितकासा वाव मिळालेला नाही. संघर्ष अधिक प्रभावीपणे पडद्यावर आला असता तर चित्रपटाने अधिक वाव मिळवला असता.